आवाहन

डिजिटल दिवाळी अंकाचं हे चौथं वर्षं आहे. या अंकात उत्तमोत्तम लेखक, कवी, अभिनेते सहभागी होत असतात आणि ते सगळे विनामोबदला सहभागी होतात. पण त्यांनी कायम विनामोबदला काम का करावं? त्यांना चांगला मोबदला देता यायला हवाच.

असे उपक्रम चालवण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असते. आम्ही अंकासाठी खास व्हिडिओ करतो, त्यातल्या तांत्रिक बाबींसाठी ब-यापैकी पैसे लागतात. त्यामुळे अंकाला जी थोडी स्पॉनरशिप मिळते आणि जो थोडा निधी क्राऊड फंडिंगमधून मिळतो त्या जोरावर आम्ही हे व्हिडिओ करू शकतो. पण जर वेगवेगळ्या विषयांवर, वेगळ्या प्रदेशात जाऊन अजून व्हिडिओ करायचे असतील तर जास्त पैसे लागतील. आणि हा अंक दृकश्राव्य असल्यानं व्हिडिओ महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. हे एक प्रकारचं डॉक्युमेंटेशन आहे.

त्यामुळेच मी असं आवाहन करतेय की जर हा अंक आपल्याला आवडला असेल, हा उपक्रम चालू राहावा असं वाटत असेल तर आपल्या इच्छेनुसार अंकासाठीच्या फंडिगला मदत करावी. ज्या कुणाला मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी digitalkatta@gmail.com या इमेलवर संपर्क साधा.

सायली राजाध्यक्ष

संपादक