डॉ. प्रकाश कोठारी- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते विख्यात आहेतच, याशिवाय त्यांची अजून एक ओळख म्हणजे प्राचीन कलात्मक इरॉटिक आर्टचे ते फ़ार मोठे संग्राहक आहेत. देशविदेशांमधे कामानिमित्ताने फ़िरत असतानाच ते त्यांच्या या छंदाच्या पूर्तीकरता त्या त्या देशांमधले जुने बाजार, रस्ते, कलावस्तुंची दुकाने धुंडाळतात, काहीवेळा खास त्याकरता अनवट जागांना भेटी देतात. शेकडो. हजारो वर्षांपूर्वीच्या दुर्मीळ कलात्मक वस्तुंना पारखण्याची तीक्ष्ण, अनुभवी, अभ्यासू नजर डॉ. कोठारींकडे आहे आणि त्याकरता भरपूर भटकंती करण्याची आवडही आहे. अकबराच्या काळातली मिनिएचर्स असोत किंवा पौर्वात्य चिनी, जपानी पोर्सेलिन,हस्तिदंताच्या वस्तू, दुर्मीळ युरोपियन पोस्टकार्ड्स, आदिम आदिवासी मुखवटे, मातीचे दिवे, बाहुल्या.. हे सगळं त्यांनी अशा भटकंतीतूनच जमवलं. त्यांच्या या प्रवासाच्या अद्भुत कहाण्या ऐकण्याचा अनुभव रोमांचकारी तर आहेच शिवाय या प्राचीन, कलात्मक इरॉटीक आर्टच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक महत्वाबद्दल खूप काही शिकवून जाणाराही.
मुलाखत – शर्मिला फडके
Wonderful Man with wonderful interview .
LikeLike