संदीपा – चेतन कारखानीस
आयुष्यात भविष्याची तजवीज सगळेच करतात पण वर्तमान मात्र वेगळंच करण्यात निसटून जातोय हे लक्षात आल्यावर संदीपा आणि चेतनचा प्रवास सुरू झाला…जग पालथं घालण्याचा. काश्मीर पासून भटकंती सुरू करत ही जोडगोळी मग दक्षिण अमेरिकेतले देश, न्यूझीलंड अशी भटकली. सलग काही महिन्यांचा प्रवास, नवे देश, नवे लोक, नवी भाषा आणि नवे मित्र. विमान, गाडी, बस, ट्रक तर कधी चक्क मालवाहू बोट…प्रवास सुरूच राहिला. कधी हॉटेल तर कधी गावातलं घर. कधी एखाद्या नव्या शहरातल्या काऊच सर्फिंगच्या होस्टचं घर तर कधी हॅमॉक टांगून केलेली विश्रांती. मुक्कामाच्या जागा आणि प्रकारही वेगवेगळे. हेतू एकच – पर्यटक म्हणून न फिरता प्रवासी होऊन फिरणं.
वेबसाईट – http://www.sandeepachetan.com
facebook : SandeepaChetan’s Travels
Instagram : @sandeepachetan
मुलाखत – अमृता दुर्वे
Excellent.. It’s a dream come true for everyone. All the best
LikeLike
संदीपा चेतन यांचे बरेचसे प्रवास विषयक लेख वाचले होते.या दोघांबद्दल जाणून घ्यायचं होतं.त्यामुळे त्या दोघांना पाहण्याची,ऐकण्याची इच्छा पूर्ण झाली.एका जगावेगळ्या जोडप्याबद्दल समजलं….खूप छान वाटलं.कौतुक वाटलं आणि भारतीय आहेत,याचाअभिमानही वाटला….तुम्हा दोघांना प्रवासासाठी शुभेच्छा…
LikeLike