नायजेरिया वास्तव्यातलं कडूगोड

नायजेरियन लोक बीफ फार खातात. किंबहुना बैलाचा मारून खाण्याखेरीज दुसरा काही, शेतीसाठी वगैरे उपयोग असतो हे त्यांना माहीत नसावं. तसं तर तिथे कोणताही पशु – पक्षी जर विषारी नसेल, तर तो खाद्यपदार्थ असतोच. इतकं, की बकरी ईदला बळी देण्यासाठी आपापल्या ऐपतीनुसार बैल, बोकड, कोंबडी, मासा आणि अगदीच काही नाही, तर कुत्रासुधा चालत असे. बुश मिट म्हणजे जंगलात झुडूपात मिळणारे उंदीर, साप तिथे फार आवडीने खातात. एरव्ही मला मत्स्याहार प्रिय. पण बीफचा वास माझ्या डोक्यात जात असे. हॉटेलात पहिल्या दिवशी जेवणात उकडलेला भात आणि टोमॅटो सूप मिळालं. म्हटलं हेही नसे थोडके. मग कळलं, की वेज सूप मागितलं की त्यातले बीफचे तुकडे बाजूला काढून देतात. पुढचा पूर्ण महिना ब्रेकफास्ट, दुपार, रात्रीचं जेवण फक्त आणि फक्त कोबी-टोमॅटोचं सलाड आणि स्पॅनिश ऑम्लेट यावर काढावा लागला.

Advertisements

३१ ऑक्टोबर १९८४

कीर्तीनगर स्टेशनवरून लोकल पकडून आम्ही नवी दिल्ली स्टेशनवर  पोचलो. पाहतो तो संपूर्ण स्टेशन शीख लोकांनी खचाखच भरलेलं... बाहेर गावच्या सगळ्या गाड्यांमधून आलेल्या शिखांना रेल्वे प्रशासनाने स्टेशनवर आश्रय दिला होता. बाहेर त्यांची कत्तल चाललेली होती. एरवी आपल्या कुर्रेबाज मिशा पिळत दमदार आवाजात बोलणारा उमदा शीख तिथे भेदरलेल्या अवस्थेत बघून खरंच हृदयात कालवाकालव झाली. फलाटावर जिकडे तिकडे शिखांची कुटुंबं, लहान लहान मुलं, बायका चादरी टाकून बसलेली. रेल्वेच्या कॅन्टीनमधून त्यांना जेवण पुरवलं जात होतं. खाली माना घालून बसलेले घाबरलेले 'सरदार' बघवत नव्हते.

मुंबई मोन्ताज

मुंबई. एक जिवंत रसरशीत शहर. या शहरात अतोनात गर्दी आहे, प्रचंड घामट हवा आहे, भरपूर घाण आहे, सामान्य माणसाचं आयुष्य कठीण आहे. पण असं असलं तरी या शहराला स्वतःचं व्यक्तित्व आहे. या शहरातला पाऊस विलोभनीय आहे, ब्रिटिशांनी बांधलेला भाग देखणा आहे. हे शहर सर्व जातीधर्माच्या, पंथाच्या, विचारांच्या लोकांना आपल्या कवेत घेतं. एकदा जो इथे येतो … Continue reading मुंबई मोन्ताज

देशांतरीच्या गोष्टी सांगता

परदेशात राहणा-या भारतीयांच्या प्रवासवर्णनांमध्ये अजिता काळे यांचं देशांतरीच्या गोष्टी सांगता हे एक उत्तम प्रवास वर्णन. अनौपचारिक, बोली भाषेत लिहिलेले त्यांचे हे लेख साधे पण रंजक आहेत. त्यांच्या या पुस्तकातल्याच लाल तारा आणि काळे धुके या रशियाबद्दलच्या लेखाचं अभिवाचन केलंय सीमा देशमुख यांनी. https://www.youtube.com/watch?v=G62wqEEsO2s&t=10s

एका झंझावाताची शतकपूर्ती

संदीप कलभंडे  ७ नोव्हेंबर २०१७ ह्या दिवशी रशियन बोल्शेव्हिक राज्यक्रांतीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. (त्या काळी रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरले जात असल्यामुळे ही घटना २५ ऑक्टोबर ची म्हणून नोंदली गेली होती. म्हणून ह्या क्रांतीला ऑक्टोबर क्रांती म्हटले जाते.) बोल्शेव्हिक राज्यक्रांतीबद्दल आजवर फारसे अलिप्तपणे बोलले गेलेले नाही. देशोदेशींच्या कम्युनिस्टांमध्ये ही क्रांती हा एक प्रेरणेचा स्रोत … Continue reading एका झंझावाताची शतकपूर्ती

नजरेपलिकडची धारावी – डॉक्युमेंटरी

अमृता दुर्वे धारावी म्हणजे अगदी आतापर्यंत आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणूुन आेळखली जाणारी वस्ती. मुंबईमधल्या एल. बी. एस. रोडने येता - जाता किंवा मुंबईच्या विमानतळावरून टेक ऑफ किंवा लँंडिंग करताना दूरवर पसरलेल्या धारावीचं दर्शन घडतं. पण ही वस्ती आतमधून कशी आहे? धारावीची स्लम टूर करणाऱ्यांमध्ये परदेशी पर्यटकांची संख्या मोठी आहे. पण नेमकं काय आहे इथे … Continue reading नजरेपलिकडची धारावी – डॉक्युमेंटरी

रारंग ढांग

प्रभाकर पेंढारकर यांचं एक फार वेगळं पुस्तक रारंग ढांग. हिमालयातल्या रस्तेबांधणीबद्दलच्या या पुस्तकात मानवी मनाच्या हळव्या बाजूंचं फार छान वर्णन आहे. या पुस्तकातल्या एका उता-याचं अभिवाचन केलंय शुभांगी गोखले यांनी. https://www.youtube.com/watch?v=ZaMEe4XudoU&t=2s