देशांतरीच्या गोष्टी सांगता

परदेशात राहणा-या भारतीयांच्या प्रवासवर्णनांमध्ये अजिता काळे यांचं देशांतरीच्या गोष्टी सांगता हे एक उत्तम प्रवास वर्णन. अनौपचारिक, बोली भाषेत लिहिलेले त्यांचे हे लेख साधे पण रंजक आहेत. त्यांच्या या पुस्तकातल्याच लाल तारा आणि काळे धुके या रशियाबद्दलच्या लेखाचं अभिवाचन केलंय सीमा देशमुख यांनी. https://www.youtube.com/watch?v=G62wqEEsO2s&t=10s

रारंग ढांग

प्रभाकर पेंढारकर यांचं एक फार वेगळं पुस्तक रारंग ढांग. हिमालयातल्या रस्तेबांधणीबद्दलच्या या पुस्तकात मानवी मनाच्या हळव्या बाजूंचं फार छान वर्णन आहे. या पुस्तकातल्या एका उता-याचं अभिवाचन केलंय शुभांगी गोखले यांनी. https://www.youtube.com/watch?v=ZaMEe4XudoU&t=2s

तोकोनोमा

नवीन वाचकांना फारसं माहीत नसलेलं पण एक उत्तम प्रवासवर्णन म्हणजे प्रभाकर पाध्ये यांचं तोकोनोमा. जपानच्या त्यांच्या या प्रवासवर्णनात फार चित्रमय वर्णन आहे. या पुस्तकातल्या एका उता-याचं वाचन केलंय सचिन खेडेकर यांनी. https://www.youtube.com/watch?v=q299XKvpx9o

तेरूओ

गौरी देशपांडेंचे पती कामानिमित्त अनेक वर्षं जपानमध्ये होते. त्यामुळे त्यांचंही दीर्घकाळ जपानमध्ये वास्तव्य झालं. जपानच्या पार्श्वभूमीवरची त्यांची तेरूओ ही कादंबरी. यातल्याच एका भागाचं वाचन केलंय चिन्मयी सुमीत यांनी. https://www.youtube.com/watch?v=bZ-4BIXuLQI

पालखी

दि. बा. मोकाशी. साधं सरळ पण भिडणारं लेखन करणारे कथालेखक. पंढरीच्या वारीवर मोकाशींनी विपुल लेखन केलंय. त्यांच्या पालखी या पुस्तकातल्या एका भागाचं वाचन केलंय मेधा कुळकर्णी यांनी. https://www.youtube.com/watch?v=h-U5k5-GrGU