बनगरवाडी

ग्रामीण पार्श्वभूमीवर लेखन करणा-यांमध्ये व्यंकटेश माडगूळकर यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. बनगरवाडी हे त्यांचं अतिशय गाजलेलं पुस्तक. एक मास्तर बनगरवाडीला येतो आणि तो तिथलाच कसा होतो याचं फार चित्रमय वर्णन त्यांच्या या पुस्तकात आहे. याच पुस्तकातल्या पहिल्या प्रकरणाचं अभिवाचन केलंय सचिन खेडेकर यांनी. https://www.youtube.com/watch?v=ZzReA_PrE2k

एका रानवेड्याची शोधयात्रा

कृष्णमेघ कुंटे यांनी लिहिलेलं एका रानवेड्याची शोधयात्रा हे एक अनोखं पुस्तक.  डिजिटल अंकासाठी त्यातल्या ऋतुचक्र या लेखाचं वाचन केलंय सोनाली कुलकर्णी यांनी. https://www.youtube.com/watch?v=nT3sS6rtWk4&t=158s

सीलिसबर्गची पत्रे

सीलिसबर्गची पत्रे हे विश्राम बेडेकर यांनी लिहिलेलं प्रवासवर्णन. डिजिटल अंकासाठी त्यातल्या काही भागाचं अभिवाचन केलंय शुभांगी गोखले यांनी. https://www.youtube.com/watch?v=UJuH5OJA1SM&t=1s