हरवलेल्या पासपोर्टची गोष्ट

अमेरिकेची एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तुम्हांला अमेरिकेचा व्हिसा मिळाला असेल तर ‘उपकार’ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे, ‘हक्क’ नाही. It’s a favor, not a right. त्यामुळे व्हिसा हरवला, तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. हे मी अमेरिकेची बाजू घ्यायची म्हणून बोलतो आहे असं नाही, ही वस्तुस्थिती आहे. कदाचित सगळ्याच देशांच्या बाबतीत हे विधान सत्य आहे. त्यामुळे तुमचा व्हिसा हरवला, तर तुमच्या जुन्या नोंदी बघून आम्हांला परत व्हिसा द्या, अशा विनंतीला कुणीही मान देणार नाही, अमेरिका तर नाहीच नाही. व्हिसा हरवला तर परत अर्ज करा असं ते सांगणार अशी मला खातरी होती आणि तसंच झालं.

इट्स कॉम्प्लिकेटेड!

मला भेटले, त्या सर्वांना भारताबद्दल जे माहीत नाही, ते जाणून घ्यायची खरीखुरी इच्छा मात्र होती. मी भारतातून आले आहे, हे कळल्यावर भूगोलाचे एक शिक्षक एकदम खूश झाले. वेळ काढून, आवर्जून त्यांनी मला त्यांच्या वर्गात बोलावलं. मुलांनी आधी थोडी तयारी केली होती. भरपूर गप्पा झाल्या. मुलं विचार करून, अभ्यासपूर्ण प्रश्न विचारत होती. अगदी भौगोलिक रचनेपासून अर्थव्यवस्था, राजकारण, आणि सामाजिक प्रश्नांपर्यंत सगळ्या विषयांवर चर्चा झाली. दोन तासांवर मी अखंड बोलत होते; जेवायची वेळ झाली, तेव्हा कसेबसे प्रश्न थांबले. त्या दिवशी मला खरंच काहीतरी चांगली कामगिरी केल्याची भावना होती. मुलांचा उत्साह, उत्सुकता, भारताबद्दलचा एवढा रस बघून छान वाटलंच, शिवाय एका छोट्याशाच गटाचं आणि माझ्या  परीनंच का होईना, पण शंकानिरसन केलं, थोडेफार गैरसमज दूर केले, याचंही समाधान होतं.

प्रवासातल्या गोष्टी आणि गोष्टींचा प्रवास

वास्तविक 'किलीमांजारो' हे नाव माझ्या ‘हजारो ख्वाइशे ऐसी’वाल्या बकेट लिस्टमध्ये अजिबातच नव्हतं. शिवाय मला डोंगरदऱ्यांत भटकायचं आकर्षण असलं तरी मी काही उच्च प्रतीची, प्रो-हायकर वगैरे नव्ह्ते. पण २०१५ च्या ऑगस्ट महिन्यात एके दिवशी अचानक मित्रमंडळींचा फोन आला 'आम्ही किलीमांजारो क्लाइंम्ब प्लॅन करतोय. तुम्ही येणार का?' आणि 'किलीमांजारो जगात नक्की कुठे आहे? त्याची उंची किती? हवामान काय? तयारी काय लागते?' या कशा कशाचाही विचारही न करता मी त्याच फोनवर 'होय. आम्ही पण येतोय' असं सांगूनही टाकलं. झालं ठरलं. किलीमांजारोला जायचं.

एक प्रवास, समाधान देणारा!

साधारण पंचवीस-एक वर्षांनंतर आई-बाबांबरोबर प्रवास करत होतो. २५ वर्षांपूर्वी मी त्यांच्या 'कडेवर' होतो, पण आता मला त्यांची काळजी घेत फिरायचं होतं. त्यांना बाहेरचं आवडेल की नाही, त्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी होईल, असं उगाचच टेन्शन आलं होतं. कधी-कधी इकडच्या धिप्पाड सिक्युरिटी ऑफिसर्ससमोर घाबरायला होतं म्हणून मी त्यांचं सगळं नीट सुरू आहे ना, हे वळूनवळून बघत होतो. माझ्या चेहऱ्यावरची चिंता बायकोनं अचूक हेरली, ती शांतपणे म्हणाली, ‘आई-बाबा पुण्याहून अमेरिकेला एकटे आले आहेत तेसुद्धा दोनदा, सो तू फार लोड घेतलं नाहीस तर सगळ्यांना आवडेल!!’ एकदम हलकं वाटलं.

लॅन्ड ऑफ मॉर्निंग काम- दक्षिण कोरिया

मी जेव्हा पहिल्यांदा शहरातून फेरफटका मारला, तेव्हा मला खूप प्रकर्षानं जाणवलं की इथं नव्याचा आणि जुन्याचा खूप सुंदर संगम आहे. कितीतरी ठिकाणी प्राचीन कोरियन इमारतींच्या बाजूलाच नव्या आधुनिक वास्तुरचना होत्या... लोकांच्या खाण्यापिण्यात आणि कपड्यांमध्येही हेच जाणवत होतं. एकीकडे अमेरिकन जगातल्या नव्या भन्नाट कल्पना आणि दुसरीकडे कोरियन संस्कृतीतून आलेल्या सवयीचा वारसा. प्रेमात मग्न असलेली जोडपी दिसायची आणि संपूर्ण कुटुंबाला घेऊन सहल काढणारे लोकही दिसायचे.  दक्षिण कोरिया पूर्वी जपानची वसाहत होता आणि दुसऱ्या महायुद्धानंतर कोरियाचं उत्तर आणि दक्षिण असं विभाजन झालं... माणसं, नातेवाईक दुरावले... उत्तरेवर साम्यवादी व्यवस्थेचा पगडा तर दक्षिण भांडवलशाहीच्या रस्त्यावर.