खाण्यासाठी नाटक आपुले

कराडला प्रयोग होता आमचा कुठल्यातरी नाटकाचा. ”कुठल्यातरी” शिवाय त्या नाटकाला दुर्दैवाने दुसरं विशेषण मला चटकन सापडत नाहीये, हे माझं मराठी कमकुवत असल्याचं चिन्ह नसून त्या संहितेचा दुबळेपणा आहे, इतकी नोंद वाचकहो तुम्ही करून घ्या. तरीही ते नाटक दोन तीन वर्ष चालू होतं. आता ही रसिकांच्या दुबळ्या रसिकतेची खूण आहे याची गाठही वाचकांनी मनाशी बांधावी ही नम्र विनंती (ही विनंती बरोबर कायम नम्रला का घेऊन फिरते?तसेच निमंत्रण हे सुद्धा कायम आग्रहाचेच असते.)

मेरे देस की इडली…..

तरच्या बारातेरा वर्षांत हाँगकाँग आणि जर्मनीत राहताना, अठरापेक्षाही जास्त पगड देशांना कामासाठी भेटी देताना, संस्कृतींमध्ये मिसळताना मुद्दाम नाही, पण आपोआपच खूप बदललो. जगात आपणच एकमेव महान नाही आहोत, हे अनेक पातळ्यांवर शिकताना खाण्यापिण्याच्या बाबतीतही, मूळ भारतीय शाकाहारी पिंड तसाच ठेवूनही पुष्कळसा उदारमतवादी झालो. आपण कधीही न घेतलेल्या चवींतसुद्धा काही चांगले स्वाद सापडू शकतात हे शिकलो. विशेष करून, हे करताना अफाट मजा आली, त्यातले काही अनुभव मांडीन म्हणतो

कल्पनाचित्रातला प्रत्यक्ष प्रवास

आणि अचानक, रस्त्याच्या उजवीकडे, क्रेमलिनच्या एका टॉवरवरील लाल तारा दिसला. 'दोन भाऊ' या पुस्तकात लेखकाने केलेले वर्णन आठवले - "संबंध जगात तेवढे सुंदर शहर कुठेही नव्हते. त्या शहरातल्या मनोऱ्यांच्या टोकांवर दिवसरात्र लाल तारे चमकत होते. आणि अर्थातच, त्या शहराचे नाव मॉस्को होते." बस पुन्हा सुरू होण्यापूर्वी घाईने काढलेल्या फोटोत तांत्रिक सफाई बिलकुलच नव्हती, पण तरीही तो क्षण जादुई होता, आणि फोटोतून जपलेली त्याची आठवण अजूनही जादुई भासते.

ग्रीस – माझी मिथाका

तेच हे सुबक देलोस. इथंच लेतोनं अर्तेमीस आणि अपोलो ह्या जुळ्या मुलांना जन्म दिला. अपोलो हा अतिशय देखणा, प्रकाशाचा देव. देलोसमधला लायन स्ट्रीट – सिंहाच्या शिल्पाकृतींनी नटलेला मार्ग केवळ बघण्यासारखा. देलोस हे बेट ऐतिहासिक, पौराणिक पुरातत्त्वकालीन संशोधनाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं स्थान. इथे वस्ती जवळपास नाहीच. आणि तेच मला इतकं लोभस वाटलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणसांचा जुलूस इथली शांतता ढवळून काढतो आणि मावळतीनंतर मात्र समुद्राच्या कुशीत आपल्या भूतकाळाचा खजिना शांतपणे जपत डहुळत्या पाण्यात स्वतःला बघणारं हे बेट. शब्दावीण लिहिलं गेलेलं नितांत एकांताचं उपनिषद.

प्रवास एकटीचा, दुकटीने!

युरोपमध्ये राहण्याची हीच मजा आहे. ऐनवेळी कुठेही पटकन जात येतं. व्हिसा किंवा तिकिटं काढायचा व्याप नाही! जेव्हा माझं त्या बॉनच्या रस्त्यांवर दोन तास घालवून दीडेकशे फोटो काढणं बिलने सहन केलं, त्याचा सोशिकपणा तेवढा टिकलेला पाहिला, तेव्हा मला माझी प्रवाससोबत्याची निवड योग्य आहे हे जाणवलं.  प्रवाससोबती असल्याचा आणखी एक फायदा म्हणजे आपलाकडे आपला  सोलो फोटो काढायला हक्काचं माणूस असतो. सेल्फी किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीला विनंती करून आपला फोटो काढावा लागत नाही.  आणि फोटो चांगला आला नाही तर तो पुन्हा काढायला सांगताना दडपण येत नाही. अगदी हवे तसे वेडेवाकडे चेहरे करून, पोजेस घेऊन निःसंकोच फोटो काढता येतात!