अंकुश वेंगुर्लेकर – स्वमुलाखत

कारने 'रोड ट्रिप' करण्याच्या जमान्यात एका उत्साही तरुणाने 2000 किलोमीटर्स ची भटकंती केली...पण ती चक्क सायकलवरून! ओरिसा आणि झारखंडच्या आदिवासी गावांतून हा तरुण त्यांचे प्रश्न आणि परिस्थिती समजून घेण्यासाठी फिरला. नवीन प्रदेश, एकट्याचा प्रवास यातून त्याला आलेले अनुभव खूप काही शिकवून गेले. अंकुश वेंगुर्लेकर सांगतोय त्याच्या सायकल यात्रेची गोष्ट. इ-मेल - www.karmatraveler.com Facebook / instagram : @karmatraveler https://www.youtube.com/watch?v=iiJVHsmfo7M&t=6s

संदीपा-चेतन कारखानीस मुलाखत

संदीपा – चेतन कारखानीस आयुष्यात भविष्याची तजवीज सगळेच करतात पण वर्तमान मात्र वेगळंच करण्यात निसटून जातोय हे लक्षात आल्यावर संदीपा आणि चेतनचा प्रवास सुरू झाला...जग पालथं घालण्याचा. काश्मीर पासून भटकंती सुरू करत ही जोडगोळी मग दक्षिण अमेरिकेतले देश, न्यूझीलंड अशी भटकली. सलग काही महिन्यांचा प्रवास, नवे देश, नवे लोक, नवी भाषा आणि नवे मित्र. विमान, गाडी, … Continue reading संदीपा-चेतन कारखानीस मुलाखत

अल्ट्रा रनर शिबानी घरत मुलाखत

शिबानी पेशाने पत्रकार. हौशी अल्ट्रा मॅरेथॉन रनर आणि सोलो ट्रॅव्हलर. एका दुखापतीमुळे शिबानीचं तायक्वांदो खेळणं थांबलं आणि ती धावण्याकडे वळली. लहान अंतरांपासून सुरुवात करणारी शिबानी आज 72 किलोमीटर, 100 किलोमीटर्स सारखी अंतरं लीलया धावते. त्यासाठी देश- परदेशात जाते. आणि पाठीवर बॅकपॅक लावून जगभर एकटी भटकत असते. कच्छ – लडाखमधली अल्ट्रा मॅरेथॉन असो किंवा तुर्कस्थान – … Continue reading अल्ट्रा रनर शिबानी घरत मुलाखत

डॉ. प्रकाश कोठारी मुलाखत

डॉ. प्रकाश कोठारी- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते विख्यात आहेतच, याशिवाय त्यांची अजून एक ओळख म्हणजे प्राचीन कलात्मक इरॉटिक आर्टचे ते फ़ार मोठे संग्राहक आहेत. देशविदेशांमधे कामानिमित्ताने फ़िरत असतानाच ते त्यांच्या या छंदाच्या पूर्तीकरता त्या त्या देशांमधले जुने बाजार, रस्ते, कलावस्तुंची दुकाने धुंडाळतात, काहीवेळा खास त्याकरता अनवट जागांना भेटी देतात. शेकडो. हजारो वर्षांपूर्वीच्या दुर्मीळ कलात्मक वस्तुंना पारखण्याची तीक्ष्ण, अनुभवी, अभ्यासू नजर डॉ. … Continue reading डॉ. प्रकाश कोठारी मुलाखत