एका झंझावाताची शतकपूर्ती

संदीप कलभंडे  ७ नोव्हेंबर २०१७ ह्या दिवशी रशियन बोल्शेव्हिक राज्यक्रांतीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. (त्या काळी रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरले जात असल्यामुळे ही घटना २५ ऑक्टोबर ची म्हणून नोंदली गेली होती. म्हणून ह्या क्रांतीला ऑक्टोबर क्रांती म्हटले जाते.) बोल्शेव्हिक राज्यक्रांतीबद्दल आजवर फारसे अलिप्तपणे बोलले गेलेले नाही. देशोदेशींच्या कम्युनिस्टांमध्ये ही क्रांती हा एक प्रेरणेचा स्रोत … Continue reading एका झंझावाताची शतकपूर्ती

Advertisements

इस्त्रायल डायरी

होलोकॉस्ट म्युझियम बघताना आपल्या मनात संताप, दुःख, असहायता, वेदना आणि सुन्नपणा अशा वेगवेगळ्या भावना उमटत राहतात. हे इतकं भयानक वास्तव आहे याची मनाला पुन्हापुन्हा जाणीव करून द्यावी लागते. जेरूसलेममध्ये असलेलं हे म्युझियम बघायला जगभरातून लोक येत असतात. हे सगळे लोक एका समान भावनेनं जोडले जातात. तो काळ रिवांइड करून बदलता आला तर किती बरं असं प्रत्येकाच्या मनात येत असणार...ज्यू लोकांच्या शरीर वैशिष्ट्यांचं वर्गीकरण करून हिटलरनं ज्यू शोधण्यासाठी काही मोजमापं तयार केली होती. म्हणजे डोक्याचा विशिष्ट आकार, उंची, हाडांची रचना हे बघून ज्यूंना शोधून काढण्याची एक पद्धत त्यानं तयार केली होती. त्यासाठी काही उपकरणं तयार केली होती. ती या म्युझियममध्ये मांडलेली आहेत. ती बघताना आपल्या जीवाचा संताप होतो. कुणी माणसाशी असं वागू शकतं? हा विचार आपला पिच्छा सोडत नाही.

स्वनियोजन करून केलेला प्रवास

ही यादी करताना सर्वात कसोटीची गोष्ट असते ती म्हणजे मोह टाळणे. प्रत्येकच गोष्ट आपल्याला बघायची असते. उपलब्ध वेळात इतके सगळे बघणे शक्य नसते. (आमच्या एका स्नेह्यांनी यावर उपाय सुचवला आहे. ते म्हणतात पहिली ट्रिप टूर कंपनीबरोबर करायची आणि त्यांच्या कार्यक्रमानुसार घाईघाईत सर्व पाहून घ्यायचे. मग त्यातले आपल्याला काय नीट पहायचे आहे ते ठरवून परत आपण आखणी करून दुसरी ट्रिप करायची. अर्थात मला हे पटले नाही.) त्यामुळे प्रेक्षणीय स्थळांमध्ये डावे उजवे करावे लागते आणि काळजावर दगड ठेवून काही ठिकाणांना भेटीची योजना न करताच राम राम म्हणावे लागते. काही ठिकाणे अगदी वरवरच्या भेटीची ठेवावी लागतात. (अनेक ठिकाणी प्रत्यक्षात गेल्यावर मात्र अरे अजून इथे रहाण्याचा प्लॅन करायला हवा होता असे हमखास वाटते.)         

आत्मशोधाचा प्रवास: धर्मानंद दामोदर कोसंबींचं ‘निवेदन’

मद्रासेत आल्यानंतर मात्र अनेक कारणांनी थेट कुशिनारेला जाण्याचा विचार रहित करून धर्मानंदांनी ब्रह्मदेशात जायचं ठरवलं. एक तर पुढल्या खर्चाची मिळवणी होईना, शिवाय, नेमकं ह्याचं काळात मद्रासच्या महाबोधी सभेत सर्व बौद्धांची एकी घडून येऊन, त्यांनी बौद्धाश्रमाची स्थापना केली. तिथं कोसंबींची व्याख्यानं, प्रवचनं होऊ लागली. त्यामुळे, कोसंबींनी तिथेचं राहावं असं त्या मंडळींना वाटू लागलं. ह्याच सुमारास, मद्रासमध्ये राहत असलेल्या काही ब्राम्ही विद्यार्थ्यांनी त्यांना मद्रासमध्ये इतर भिक्षू नसताना एकटे राहण्यापेक्षा म्यानमारला येऊन बौद्ध विहारात अध्ययन करणं अधिक चांगलं असा आग्रह केला मद्रासहून म्यानमारपर्यंत आगबोटीचे भाडे मिळवून देऊ असं वचन दिलं. पर्यायानं, १९०३ च्या ऑक्टोबर महिन्यात कोसंबी मद्रासहून ब्रह्मदेशाकडे रवाना झाले.

मेरे देस की इडली…..

तरच्या बारातेरा वर्षांत हाँगकाँग आणि जर्मनीत राहताना, अठरापेक्षाही जास्त पगड देशांना कामासाठी भेटी देताना, संस्कृतींमध्ये मिसळताना मुद्दाम नाही, पण आपोआपच खूप बदललो. जगात आपणच एकमेव महान नाही आहोत, हे अनेक पातळ्यांवर शिकताना खाण्यापिण्याच्या बाबतीतही, मूळ भारतीय शाकाहारी पिंड तसाच ठेवूनही पुष्कळसा उदारमतवादी झालो. आपण कधीही न घेतलेल्या चवींतसुद्धा काही चांगले स्वाद सापडू शकतात हे शिकलो. विशेष करून, हे करताना अफाट मजा आली, त्यातले काही अनुभव मांडीन म्हणतो

माझा प्रवास – एका प्रवासाची कहाणी

भटजींचा आणखी एक मनोरंजक दृष्टिकोन म्हणजे ते वैयक्तिक आचरणाचा कार्यकारणभाव  एका प्रकारच्या ‘नैतिक पर्यावरणा’शी लावतात, आणि असे करताना नैसर्गिक पर्यावरणातल्या बाबींचा आधार घेतात. उदाहरणार्थ, बुंदेलखंडातल्या स्त्रियांच्या व्यभिचाराचे कारण हे तिथले ‘पाणी’ आहे, असे त्यांचे मत आहे. हे पाणी ‘पुरुषांना वाईट’ आणि त्यामुळे ‘येथे षंढ फार निपजतात’ असे ते सांगतात. अशा प्रकारे पर्यावरणीय बाबीमुळे निष्पन्न होणाऱ्या षंढत्वाची सांगड त्यांनी नैतिक भ्रष्टतेशी घातली आहे. एकंदरीतच, लैंगिक नीतिमत्तेचा अभाव किंवा एक प्रकारची स्वैर सामाजिक नीतिमत्ता हे भटजींच्या ‘परदेश’-संकल्पनेत महत्त्वाची भूमिका बजावते. उत्तर भारतीय लोकांचा उल्लेख, ते ब्राह्मण असले तरीही, ‘रांगडे’ असा करतात; किंबहुना ‘रांगडे’ आणि ‘दक्षिणी’ ही त्यांनी वापरलेली एक वर्गीकरणात्मक दुविधा आहे.

इब्न बतुता- एक पुरातन प्रवासी

इब्न बतुता शिकलेला होता, वेगवेगळ्या समाजांत वावरलेला, लोकांना धरून राहणारा होता, वरिष्ठ कुळातून आलेला हा तरुण त्याच्या ओळखीच्या मुस्लीम जगतात फिरला. जिथंजिथं गेला तिथं त्याला समविचारी लोक भेटले. परंतु पोलो हा व्यापारी होता, त्याचं औपचारिक शिक्षण झालं नव्हतं, त्यानं विचित्र, अनोळखी अशा संस्कृतींचा प्रवास केला. तिथं गेल्यावर त्याला पोशाख करण्याच्या, बोलण्याच्या आणि वागण्याच्या नव्या पद्धती कळल्या. इब्न बतुता स्वतःविषयी, भेटलेल्या लोकांविषयी आणि त्यानं स्वीकारलेल्या पदांविषयी सांगतो तर मार्को पोलो निरीक्षण करून मिळालेली अचूक माहिती सांगण्यावर भर देतो. ते काहीही असलं, तरी सातशे वर्षांपूर्वी आतंरखंडीय प्रवास  करणाऱ्या दोन लेखकांनी लिहिलेली पुस्तकं आपल्याला वाचायला मिळताहेत हे आपलं केवढं भाग्य!