‘मुसाफिर, जाएगा कहां?’

प्रवास आगगाडीचा असो, छकड्याचा किंवा चक्क पायपीट असो, प्रवास हेच श्रेयस नि प्रेयसही. हेच आहे भारतीय तत्त्वज्ञान. 'प्रभात'च्या 'कुंकू'त म्हटलंय ना: 'मन सुद्द तुझं गोस्ट हाये प्रिथवी मोलाची/ तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कुणाची, पर्वा बी कुणाची'. 'न्यू थिएटर्स'ला तुफान मेलचं, होड्यांचं अप्रूप असू दे, आपले 'प्रभात'वाले पुण्याचे. आगरकरी वळणाचे. त्यांची भिस्त दोन पायांवर. राज कपूरनं 'अनाड़ी'त चालताचालता हेच सांगितलं, पण त्याच्या शैलीत. 'जीना इसी का नाम है...'

Advertisements