प्रवास जर्मनीचा…जर्मनीतला

तेजल राऊत गेल्या जवळपास चार वर्षांपासून जर्मनी ही आमची, म्हणजे माझ्या नवऱ्याची आणि माझी कर्मभूमी आहे. ह्या चार वर्षांचा प्रवास तर रंजक आहेच पण त्याचबरोबर जर्मनीला जाण्याचा प्रवासही गंमतीशीर आहे. कारण तो म्हणावा तसा ´प्लॅन्ड´ नाहीये. मी मुंबईची. २००६ ते २००८ दरम्यान मुंबईतल्या वेलिंगकर कॉलेजमधून मी MBA केलं. MBA संपायच्या ६ महिने आधी, म्हणजे डिसेंबर … Continue reading प्रवास जर्मनीचा…जर्मनीतला

Advertisements

जर्मनीशी जुळवून घेताना…

युरोपमध्ये बहुधा सगळीकडेच भारतीयांना येत असलेली अडचण म्हणजे इथली भयाण शांतता आणि एकटेपणा! हे विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये जास्त जाणवतं. कारण दिवसभर थंडी असतेच आणि खिन्न, उदास वातावरणही असतं. मला इथं पहिल्या वर्षी जे घर मिळालं ते स्टुडंट-हाउसिंगमध्ये नव्हतं. मुख्य शहरापासून किंचित लांब होतं. माझ्या जवळपास मोजकेच विद्यार्थी राहत होते आणि बरेचसे माझ्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं बरेच मोठे आणि विचारांनी खूपच स्वतंत्र होते. माझ्यासारखी पदवी-शिक्षण झाल्या-झाल्या इथं आलेली समवयस्क मंडळी माझ्या जवळपास नव्हतीच. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी किंवा युनिव्हर्सिटीतून घरी आल्यावर मी एकटी-एकटीच असायचे.