पॅकिंग पॅकिंग!

प्रवासाला कुठे जातोय हे लक्षात घेऊन नेहमीच पॅकिंग करावं लागतं. पण काही ठिकाणी विशेष काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ गुरूद्वारात जाणार असाल तर डोक्यावर ओढणी किंवा स्कार्फ घ्यावा लागतो. किंवा काही अरब देशांमध्ये जाताना डोक्यावर स्कार्फ घालणं सक्तीचं असतं. तेव्हा हेही लक्षात ठेवा

ट्रॅव्हलिंग वेबसाइट्स अॅन्ड अॅप्स

गेल्या काही वर्षांत प्रचलित झालेल्या दोन वेबसाइट्स म्हणजे Airbnb आणि HomeAway. या दोन्ही वेबसाइट्सवर स्थानिक लोकांची घरं किंवा काही खोल्या भाड्यावर घेऊन राहायची संधी तुम्हाला मिळते. इतर हॉटेल्स किंवा हॉस्टेल यांपेक्षा अशा जागा अनेकदा खूपच स्वस्त किमतीत मिळतात. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला तुमचं जेवण स्वतः बनवायची सोय मिळते. वयस्कर किंवा डायट-रिस्ट्रिक्शन किंवा पथ्य असलेल्या लोकांसाठी हा उत्तम पर्याय असतो. एखाद्या जागेचं बुकिंग केल्यावर ते बुकिंग रद्द करण्यासाठीची धोरणं प्रत्येक जागेची वेगवेगळी असतात आणि त्यानुसार तुम्हांला तुमचं शुल्क परत मिळतं. अनेकदा त्या जागांचे मालक जर तुम्हांला जागा देऊ शकत नसतील, तर बुकिंग केल्यावर लगेच किंवा काही दिवसांत तुम्हाला तुमचे पैसे परत करतात.