एका झंझावाताची शतकपूर्ती

संदीप कलभंडे  ७ नोव्हेंबर २०१७ ह्या दिवशी रशियन बोल्शेव्हिक राज्यक्रांतीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. (त्या काळी रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरले जात असल्यामुळे ही घटना २५ ऑक्टोबर ची म्हणून नोंदली गेली होती. म्हणून ह्या क्रांतीला ऑक्टोबर क्रांती म्हटले जाते.) बोल्शेव्हिक राज्यक्रांतीबद्दल आजवर फारसे अलिप्तपणे बोलले गेलेले नाही. देशोदेशींच्या कम्युनिस्टांमध्ये ही क्रांती हा एक प्रेरणेचा स्रोत … Continue reading एका झंझावाताची शतकपूर्ती

कल्पनाचित्रातला प्रत्यक्ष प्रवास

आणि अचानक, रस्त्याच्या उजवीकडे, क्रेमलिनच्या एका टॉवरवरील लाल तारा दिसला. 'दोन भाऊ' या पुस्तकात लेखकाने केलेले वर्णन आठवले - "संबंध जगात तेवढे सुंदर शहर कुठेही नव्हते. त्या शहरातल्या मनोऱ्यांच्या टोकांवर दिवसरात्र लाल तारे चमकत होते. आणि अर्थातच, त्या शहराचे नाव मॉस्को होते." बस पुन्हा सुरू होण्यापूर्वी घाईने काढलेल्या फोटोत तांत्रिक सफाई बिलकुलच नव्हती, पण तरीही तो क्षण जादुई होता, आणि फोटोतून जपलेली त्याची आठवण अजूनही जादुई भासते.

कधी अन् जडतेला त्या, मनामनाचे आले पोत…

या सहलीच्या सुरुवातीला, आम्हांला रशियात असताना सहसा राजकीय विषयांवर तिऱ्हाइतांशी चर्चा करू नका, अशी सूचना मिळालेली असते. पण हळूहळू भीड चेपते. दमित्रीची उत्तरं सावध असली तरी पुरेशी सूचक, बोलकी असतात. साधारणत: पुतिनची रशियाबाहेर जी 'कुठल्याही थराला जाऊ शकणारा हुकूमशाही प्रवृत्तीचा राज्यकर्ता' अशी प्रतिमा आहे, त्याला बरीचशी पुष्टी मिळत जाते. ह्या ढोबळ गोष्टींखेरीज, त्यानं नोंदवलेलं एक निरीक्षण मला महत्त्वाचं वाटतं. त्याच्या मते, अशा राज्यकर्त्यांना सातत्यानं आपण 'अल्फा मेल' आहोत, हे सतत ठसवत राहणं भाग आहे. अशा राज्यकर्त्यांच्या प्रेमात आणि धाकात असलेला सामान्य जनतेतला एक वर्ग, मग आपल्या नेत्याच्या अचाट शारीरिक पराक्रमांच्या कपोलकल्पित कहाण्यांचे गोडवे गात बसतो. इथल्या युवावर्गात सध्या बोकाळलेली शारीरिक सौष्ठवाची फॅशनेबल क्रेझही याचाच एक भाग असू शकेल, असा त्याचा कयास आहे. काही साम्यं, काही फरक मी मनातल्या मनात नोंदवतो.

सोवियत युनियन आणि रशिया- स्मरणवहीतल्या नोंदी

युनिव्हर्सिटी कॅम्पस, मेट्रो, दुकानं आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सोवियत लोक उघडपणे बोलत. तसंच वर्णद्वेषही कुठं आढळला नाही. १९८९-९० मध्ये आम्हां विद्यार्थ्यांना ९० रुबल शिष्यवृत्ती मिळत असे. तिन्ही वेळा भरपूर पोटभर जेवण, वह्या व इतर साहित्य खरेदी केल्यानंतर देखील २०- २५ रुबल्स शिल्लक राहायचे. कंजूष विद्यार्थ्यांचे तर घसघशीत ४०-४५ शिल्लक राहायचे! दुपारच्या थ्री कोर्स मिल साठी ६० कोपेक पण हेअर कटिंगसाठी दिड ते तीन रुबल्स खर्च व्हायचे त्यामुळे विद्यार्थी केस वाढवणं पसंत करत.