माझी मुंबई

बेस्टच्या १०८ नंबरच्या  बसने उतरले की वाळकेश्वरला बसस्टॉपसमोर अनेक भाजीवाल्या बसलेल्या असत मी त्याच्याकडून भाजी, फळे खरेदी करत असे.  पुष्कळ वेळा ओझे जास्त झाले तर मी माझ्याकडे काम करणा-या बाईला भाजी आणायला पाठवत असे.  त्या बायका मला चांगल्या ओळखू लागल्या. एका बाईकडे एक छोटे दोनअडीच वर्षाचे मूल होते. मी त्याला खाऊ देत असे. तेही जाता येत ओळखीचे हसू देत असे. नकळत माझा जीव त्या मुलात गुंतला. रोज भेटण्याचा लळा  लागला होता. काही दिवसांनी ते मूल अचानक दिसेनासे झाले. मी विचारले तर ती बाई तुटक उत्तर देऊ लागली.  

गोइंग टू बॉम्बे…

गरीब सैनिक, कनिष्ठ व्यापारी यांच्या मिश्रवंशीय मुली उघडउघड वेश्याव्यवसायात ढकलल्या जात. मुंबईत व्यापारानिमित्त येणाऱ्या खलाशांमुळे जे ‘रेड लाईट एरिया’ नव्याने विकसित होत होते तिथे देहविक्रय करता करता या स्त्रिया कोणत्या दफनभूमीत गाडल्या गेल्या त्यांची कोणतीही नोंद इतिहासात नाही. मुंबई बेटांवर पोर्तुगीज वा इंग्रजही स्थलांतरित म्हणून बाहेरून आले. पण इथल्या स्त्रिया उपभोगून घेताना जे भोग त्यांनी या आणि पुढल्या पिढ्यांमधल्या स्त्रियांच्या माथी रचले, ते भीषण होते.

मुपो चिंचवड ते गोवा – एक स्थलांतर

अल्तिनोच्या रस्त्याला लागण्यापूर्वी पणजीतील आगळी वेगळी रचना असलेलं चर्च दिसलं. चर्चच्या असंख्य पायऱ्यांनी एका क्षणात लक्ष वेधून घेतलं. अल्तिनोचा चढ लागेपर्यंत माहीत नव्हतं की हा एक टेकडीचा भाग आहे. 'अल्त' वरून अल्तिनो हे समजायला वेळ लागला. गोवा शासनाच्या मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक मंत्री, शासकीय अधिकारी यांची निवासस्थानं याच भागात आहेत. शिवाय सर्व शासकीय गेस्टहाऊसेस, पणजी दूरदर्शन, आकाशवाणीदेखील याच टेकडीवर आहे. टेकडीच्या वळणावळणाच्या रस्त्यांनी जाताना खाली दरीत शहराची झलक दिसत होती. अल्तिनो टेकडीचा तो वळणदार रस्ता खूप आवडून गेला. या रस्त्यावरून पायी चालत गेलं पाहिजे असं मनोमन ठरवूनही टाकलं. अल्तिनो टेकडी कधी मला पणजीच्या डोक्यातील मुगुट वाटली तर कधी पणजी शहराची पहारेकरीण. अल्तिनोवरील गेस्टहाऊसमध्ये पुढची दहा वर्ष मुक्काम असेल असं त्यावेळेला पुसटसंही वाटलं नाही.

मी एक जिप्सी

आम्ही राहतो ते क्रॅको शहर एके काळी पोलंडची राजधानी होतं. विस्तीर्ण, देखणं, पोलंडच्या सांस्कृतिक समृद्धीचा वारसा सांगणारं, युद्धातल्या बॉम्ब हल्ल्यांची फारशी झळ न पोचलेलं, विस्तूला (उच्चारी विस्वा) नदीच्या काठी वसलेलं, क्रॅको आता स्वत:चं शहर वाटावं इतकं जवळचं झालं आहे. सहाशे पन्नास वर्षं जुनं यागोलोनियन विद्यापीठ ह्याच शहरात आहे. विद्यार्थ्यांचं शहर म्हणूनही ह्या शहराची ओळख आहे. पण त्याचबरोबर छोटे रस्ते, अरुंद गल्ल्या आणि शहराची वाहतूक पेलण्याच्या क्षमतेच्या काही पटीत वाढत गेलेली रहदारी. पश्चिम युरोपच्या तुलनेत (जर्मनी वगळता) इथलं ड्रायव्हिंगही बऱ्यापैकी बेधडक.

स्थलांतरात रुतून बसलेलं ‘कायाचक्र’…..

रोज डझनावारी 'मिसिंग'च्या तक्रारी जिथं येतात, तिथं अज्ञात मुलींच्या मिसिंगची तक्रार फार मोठी नव्हती. मुलींचं हरवणं ही काही फार मोठी बाब नव्हती. त्या तक्रारींचा निपटारा करणाऱ्या पोलिसाकडे मुलींची वेशभूषा, चेहरेपट्टी आणि मूळ पत्त्याची माहिती जमा झाली होती. त्या मुलींची नावं खरी का खोटी हे जिथं माहीत नाही, तिथं पत्ता खरा की खोटा हे कळायला मार्ग नसतो हे एचक्यूच्या पोलिसांना चांगलं ठाऊक होतं. तरीही त्यांनी सवयीप्रमाणे बारकाईनं नावगाव वाचलं - ‘निर्मला यादव आणि मेहेर सरीन, राहणार नटपुरवा, तेहसील - संदील, जिल्हा हरदोई उत्तर प्रदेश !’ गावाच्या नावापाशी पोलीस जरा अडखळले. त्याचं कारणच तसं होतं.

माझा डच अनुभव

इथले लोक खूपच लॉजिकल आहेत. प्रत्येक गोष्ट ते सारासार विचार करूनच करतात. या वेळच्या निवडणुकांमध्ये ही गोष्ट कसाला लागणार असे वाटत होते, पाश्चात्त्य देशात वाढत चाललेल्या कडव्या प्रवृत्तींच्या पार्श्वभूमीवर, रोख अर्थात अमेरिका आणि ब्रिटन, नेदरलँड्समधील जनतेने विद्यमान पंतप्रधानांनाच निवडून दिले आणि खरोखरच ते उदारमतवादी आहेत, हे कृतीने दाखवून दिले. सध्या तरी नेदरलँड्सने (आणि नंतर फ्रान्सने ) नक्कीच ह्या बाबतीत योग्य दिशा दाखवली आहे आणि ब्रिटन अमेरिकेने चालू केलेली साखळी मोडून काढली आहे. इथे मतदानासाठी सुट्टी नसते आणि मतदान केंद्रे रेल्वेस्टेशनवरसुद्धा असतात जेणेकरून लोकांना ऑफिसला जाताना मतदान करता यावे. 

माझं इंग्लंड…

या देशांमधल्या लोकांकडून खूप काही घेण्यासारखं आहे. व्यक्तिस्वातंत्र्य इथं खूप जपलं जातं. आपल्या देशात आपण प्रत्येक गोष्टीला ‘answerable’ असतो. लग्नाआधी पालकांना आणि नंतर सासरच्यांना, आजूबाजूच्यांना, मित्रमैत्रिणींना आणि ऑफिसमध्ये सहका-यांना आपण प्रत्येक गोष्ट का करतो, हे समजावून सांगावं लागतं. आपल्याला कराव्याशा वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कारण असावं लागत नाही, ही संकल्पना आपल्या पचनीच पडत नाही. त्यामुळे सतत सगळ्याची उत्तरं शोधण्याचं खूप बंधन वाटतं आणि तीच अपेक्षा मग आपणही इतरांकडून करतो. इथं एखादी गोष्ट जमणार नाही असं म्हटल्यावर समोरचा का असं विचारात नाही.