३१ ऑक्टोबर १९८४

कीर्तीनगर स्टेशनवरून लोकल पकडून आम्ही नवी दिल्ली स्टेशनवर  पोचलो. पाहतो तो संपूर्ण स्टेशन शीख लोकांनी खचाखच भरलेलं... बाहेर गावच्या सगळ्या गाड्यांमधून आलेल्या शिखांना रेल्वे प्रशासनाने स्टेशनवर आश्रय दिला होता. बाहेर त्यांची कत्तल चाललेली होती. एरवी आपल्या कुर्रेबाज मिशा पिळत दमदार आवाजात बोलणारा उमदा शीख तिथे भेदरलेल्या अवस्थेत बघून खरंच हृदयात कालवाकालव झाली. फलाटावर जिकडे तिकडे शिखांची कुटुंबं, लहान लहान मुलं, बायका चादरी टाकून बसलेली. रेल्वेच्या कॅन्टीनमधून त्यांना जेवण पुरवलं जात होतं. खाली माना घालून बसलेले घाबरलेले 'सरदार' बघवत नव्हते.

माझी मुंबई

बेस्टच्या १०८ नंबरच्या  बसने उतरले की वाळकेश्वरला बसस्टॉपसमोर अनेक भाजीवाल्या बसलेल्या असत मी त्याच्याकडून भाजी, फळे खरेदी करत असे.  पुष्कळ वेळा ओझे जास्त झाले तर मी माझ्याकडे काम करणा-या बाईला भाजी आणायला पाठवत असे.  त्या बायका मला चांगल्या ओळखू लागल्या. एका बाईकडे एक छोटे दोनअडीच वर्षाचे मूल होते. मी त्याला खाऊ देत असे. तेही जाता येत ओळखीचे हसू देत असे. नकळत माझा जीव त्या मुलात गुंतला. रोज भेटण्याचा लळा  लागला होता. काही दिवसांनी ते मूल अचानक दिसेनासे झाले. मी विचारले तर ती बाई तुटक उत्तर देऊ लागली.  

गोइंग टू बॉम्बे…

गरीब सैनिक, कनिष्ठ व्यापारी यांच्या मिश्रवंशीय मुली उघडउघड वेश्याव्यवसायात ढकलल्या जात. मुंबईत व्यापारानिमित्त येणाऱ्या खलाशांमुळे जे ‘रेड लाईट एरिया’ नव्याने विकसित होत होते तिथे देहविक्रय करता करता या स्त्रिया कोणत्या दफनभूमीत गाडल्या गेल्या त्यांची कोणतीही नोंद इतिहासात नाही. मुंबई बेटांवर पोर्तुगीज वा इंग्रजही स्थलांतरित म्हणून बाहेरून आले. पण इथल्या स्त्रिया उपभोगून घेताना जे भोग त्यांनी या आणि पुढल्या पिढ्यांमधल्या स्त्रियांच्या माथी रचले, ते भीषण होते.

स्थलांतरात रुतून बसलेलं ‘कायाचक्र’…..

रोज डझनावारी 'मिसिंग'च्या तक्रारी जिथं येतात, तिथं अज्ञात मुलींच्या मिसिंगची तक्रार फार मोठी नव्हती. मुलींचं हरवणं ही काही फार मोठी बाब नव्हती. त्या तक्रारींचा निपटारा करणाऱ्या पोलिसाकडे मुलींची वेशभूषा, चेहरेपट्टी आणि मूळ पत्त्याची माहिती जमा झाली होती. त्या मुलींची नावं खरी का खोटी हे जिथं माहीत नाही, तिथं पत्ता खरा की खोटा हे कळायला मार्ग नसतो हे एचक्यूच्या पोलिसांना चांगलं ठाऊक होतं. तरीही त्यांनी सवयीप्रमाणे बारकाईनं नावगाव वाचलं - ‘निर्मला यादव आणि मेहेर सरीन, राहणार नटपुरवा, तेहसील - संदील, जिल्हा हरदोई उत्तर प्रदेश !’ गावाच्या नावापाशी पोलीस जरा अडखळले. त्याचं कारणच तसं होतं.

इ है बंबई नगरिया…

मुंबई जशी अनुकूल होती तशी प्रतिकूलही होती. याचा अनुभव पुढे नोकरी करताना आला. भले ऑफीसमध्ये ऑटोसेंसर मुतारी, एसी असेल हो, भाड्याच्या घरी तर सार्वजनिक शौचालय ! तुम्हाला तुमचे केविलवाणे तोंड बघून एक वेळ परीक्षेत दोन मिनिटे जास्त देईल पेपर लिहायला, पण इथे? छे, इथे सर्वधर्म-सर्वनोकरी-सर्व'प्रेशर'-समभाव ! अगदी ५२ पिढ्यांची ओळख असणारादेखील तुम्हाला तुमची केविलवाणी अवस्था बघूनही रांगेत पुढे जाऊ देणार नाही, आणि नंबर आल्यावर दोन मिनिटांत दारावर धाडधाड सुरू! लहानपणी बाबा नेहमी सांगायचे की स्वतःच्या पायावर उभा राहिलास ना की कळेल आयुष्य - ते इथे मुंबईत येऊन उमगले - आयुष्य तर म्हणता येणार नाही पण स्वतःच्या पायावर उभे राहणे! नाहीतर काय, खरंच!

हिंदोळ्यावर

घरांप्रमाणे जागोजागी दिसणारी खिल्लारं म्हणजे स्वित्झर्लंडचं वैभवच! तसंही हा देश दूधदुभत्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या गायींकडे बघितल्यावर ती समृद्धी जाणवते. पण हे दृष्टिसुख अनुभवण्यापूर्वी आपले कान तृप्त होतात ते गाईंच्या गळ्यात असलेल्या स्विस बेल्सच्या विशिष्ट नादानं. या घंटा बसक्या असतात, आपल्याप्रमाणे गोलाकार नाहीत. धातू मिश्र असावा. काही घंटा पितळेच्या वाटतात तर काही अ‍ॅंटिक लुक असणार्‍या. यांचा नाद ऐकत राहावा असा. आम्ही रेकॉर्ड करायचा केलेला प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही, पण तो कानात मात्र अजूनही रुणझुणतो आहे. या संगीतानं आम्हांला जागोजागी खिळवून ठेवलं.

फोर्ट, कोर्टची मुंबई

मुळात आयुष्यच खडतर आहे, तर सहवास कशाला खडतर करायचा ही त्यामागची समंजस भूमिका मला मोलाची वाटली. इथं प्रत्येक जण एकमेकाला मदत करताना दिसतो, कारण प्रत्येकाला कष्टाची जाणीव आहे आणि प्रत्येकाला तेच हवंय जे इतरांना हवंय. आयुष्याला वेळेच्या बंधनात साजरं करता येण्याची कला म्हणजेच जगणं याची जाणीव सर्वांना आहे. अडलेल्याला दुसरा मदत करतो कारण तोही कधीतरी अडणार असतो, तेव्हा त्यालाही मदतीची गरज असणार असते. इथल्या माणसामध्ये रक्ताच्या बरोबरीनं वेग धावतो. मुंबईत पैसा, सुबत्ता आणि वेग आहे. गावाकडे स्वास्थ्य आहे.