झोपडपट्टी पर्यटन – नैरोबी आणि धारावी

आपण प्रवासाला जातो. तेव्हा तिथला प्रदेश बघतो. जंगलं, पर्वतशिखरं, नद्या, समुद्र, डोंगर, दर्‍या या निसर्गलीला आणि मानवनिर्मित किल्ले, मंदिरं, विविध संग्रहालयं, कलादालनं असं काय काय.  पण एखादा प्रदेश म्हणजे फक्त स्थळ नसतं. या सार्‍यात प्राण फुंकणारी तिथली तिथली माणसं असतात. माणसांनी निर्मिलेलं एक वातावरण असतं. त्यांनी घडवलेला इतिहास, त्यांचे जय-पराजय, धर्म, संस्कृती यांचा रंगगंध त्या वातावरणात मिसळलेला असतो. त्यांची भाषा, खाणं-पिणं, घरं, जगण्याची रीत यामुळे त्या प्रदेशाला व्यक्तिमत्व बहाल झालेलं असतं. प्रवासात त्या त्या प्रदेशातल्या स्थानिक माणसांना भेटणं म्हणजे त्या ठिकाणची खरी ओळख करून घेणं असतं. माणसं आलिशान सुखवस्तू भागांत राहातात तशी वंचित अभावग्रस्त वस्त्यांमध्येही राहातात. ही सगळी माणसं हेच त्या प्रदेशाचं प्राणतत्व. आजवरच्या साइट सीइंग टूर्समध्ये ही माणसं आणि त्यांच्या वस्त्या अदृश्य असायची. उदाहरणार्थ किबेरा.  

Advertisements